शनिवार, 8 अप्रैल 2017

👉 _*राज्यघटनेतील काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या*_

                      _*स्पर्धा परीक्षा तयारी*_
👉 पहिली घटनादुरुस्ती - भारतीय राज्यघटनेत 1951 मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेत 31-अ आणि 31-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.

👉 7 वी घटनादुरुस्ती - भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी 1956 मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली.@esprdhapariksha

👉 17 वी घटनादुरुस्ती  - 1964 मध्ये झालेली ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम 31 मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे.

@esprdhapariksha

👉 42 वी घटनादुरुस्ती - 1976 साली झालेली ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झाली. यामध्ये राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने समाविष्ट केले गेले.

👉 44 वी घटनादुरुस्ती - 1978 मध्ये झालेल्या या दुरुस्तीमध्ये 42 व्या घटनादुरुस्ती मधील वादग्रस्त भाग दूर करणे हा उद्देश होता.

👉 52 वी घटनादुरुस्ती - पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने घालण्याच्या दृष्टीने 1985 साली ही घटनादुरुस्ती केली.

👉 61 वी घटनादुरुस्ती - 1989 साली झालेल्या या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या 326 व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली.

👉 73 वी घटनादुरुस्ती - पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचे काम 1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत करण्यात आले.

👉 86 वी घटनादुरुस्ती - 2002 मधील या घटनादुरुस्तीने घटनेच्या 21 व्या कलमात 21-अ हे नवे कलम जोडण्यात आले.

👉 92 वी घटनादुरुस्ती - 2003 मधील या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात बदल करण्यात आला.

👉 93 वी घटनादुरुस्ती - 2006 मधील या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली.www.rahwarmaske.blogspot.com

रविवार, 12 मार्च 2017

1. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी पुढील कोणत्या पात्रतेची अनिवार्यता आवश्यक आहे?
अ. संबंधित व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
ब. संबंधित व्यक्ती राज्यसभेत निवडून येण्यास पत्र असावी.
क. संबंधित व्यक्ती लोकसभेत निवडून येणास पत्र असावी.
ड. संबंधित व्यक्ती संसदेच्या दोन्ही गृहात निवडून येण्यास पात्र असावी.

अ व ड

अ व क

अ, ब व क

अ, ब, क, ड

उत्तर : अ व क

स्पष्टीकरण :-

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी राज्यसभेत निवडून येण्याची पात्रता आवश्यक नाही. अशी पात्रता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक आहे.

2. राज्य पूनर्रचना आयोगामध्ये पुढीलपैकी कोणता सदस्य नव्हता?

फाजल अली

के.एम. पन्नीकर

हृदयनाथ कुंजरू

यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

स्पष्टीकरण :-

राज्य पुनर्रचना आयोग बद्दल माहिती -

22 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापना झाली.

फाजल अली, हृदयनाथ कुंजरू व के.एम. पन्नीकर हे तीन सदस्य होते.

10 ऑक्टोबर 1956 रोजी अहवाल सादर झाला.

या आयोगाने दोन शिफारस केल्या, गुजरात व मराठी भाषिकांचे एकत्र राज्य निर्मिती व 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश.

3. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत कशाचा समावेश होत नाही?

संसदीय शासनपद्धती

केंद्र-राज्य संबंधाची अधिकार विभागणी

राज्यांची स्वायत्तता

मूलभूत अधिकार

उत्तर : राज्यांची स्वायत्तता

स्पष्टीकरण :-

केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार (1973) या खटल्यात न्यायालयाने संसद मूलभूत अधिकारासह कोणत्याही भागात घटना दुरूस्ती करू शकते मात्र संसद घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही.

तसेच त्यामध्ये संसदीय शासनपद्धती, संघराज्या व्यवस्था, घटनेचे श्रेष्ठत्व व मूलभूत अधिकारांची समाप्ती या बाबींचा समावेश होतो.

4. जोड्या जुळवा.
  मूलभूत हक्क                                                               तरतूद
अ. नोकरीची समान संधी                                              1. 32
ब. माणसांचा क्रय विक्रय करण्यास बंदी                         2. 16
क. धार्मिक संदर्भात दिलेल्या दानावर आयकरत सूट      3. 23
ड. न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार                      4. 28

अ-2, ब-3, क-1, ड-4

अ-2, ब-3, क-4, ड-1

अ-3, ब-2, क-4, ड-1

अ-3, ब-2, क-1, ड-4

उत्तर : अ-2, ब-3, क-4, ड-1

स्पष्टीकरण :-

मूलभूत हक्कांची तरतुद घटनेच्या 3र्‍या भागात कलम 12 ते 36 मध्ये केली असून कलम 12 मध्ये 'राज्याची' व्याख्या दिली आहे. तर कलम 13 हे न्यायलयीन पूनर्विलोकनाशी संबंधित आहे.

5. जिल्हा परिषदेच्या विषय समितीबाबतच चुकीचे विधान कोणते?

जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून एक महिन्याच्या आत या समित्यांची रचना केली जाते.

विषय समित्यांच्या सदस्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे द्यावा लागतो.

स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांचा कार्यकाल हा जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कार्यकालएवढाच असते.

विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाल अडिच वर्षाचा असतो.

उत्तर : विषय समित्यांच्या सदस्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे द्यावा लागतो.

स्पष्टीकरण :-

जि.प. ला विषय समित्यांमार्फत कार्य करणारी संस्था असेही म्हटले जाते.

जि.प. एकूण 10 समित्या असून 'स्थायी समिती' सर्वात महत्वाची समिती असून जि.प. अध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

विषय समित्याच्या सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांना तो संबंधित समितीच्या सभापतीकडे द्यावा लागतो.